
राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’अंतर्गत 29 सप्टेंबरला राज्यभर एकाच दिवशी एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
औया रोजगार मेळाव्यांमधून स्थानिक युवकांना विविध आस्थापना आणि उद्योगांमधील रोजगाराच्या संधी, उपलब्ध पदे आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांनी या मेळाव्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




























































