
महिलेवर सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या माजी पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याच्या साथीदाराने बिल्डरला धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार बिल्डर रोहित दीक्षित यांनी पोलिसांकडे केली आहे.
बिल्डर दीक्षित यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी त्यांना व्हॉट्सअॅपवरून कॉल केला. यावेळी शिवीगाळ करून पाटील आणि देशमुख यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले. तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप दीक्षित यांनी केला आहे. तक्रारीची दखल घेत खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकी देण्यामागे पाटील किंवा देशमुख यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.



























































