
केरळममध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मलप्पूरम जिह्यातील निलांबूर येथील चोक्कड भागात डोंगराळ भागात मुसळधार पाऊस आल्याने कोट्टापुझा नदीला अचानक पूर आला. रविवारी पर्यटक या नदीत होते. वेगाने पाणी आल्याने यामध्ये सहा जण वाहून गेले. सोमवारी दुपारपर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले असून एकाचा शोध सुरू आहे. हवामान विभागाने पथनमथिट्टा, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.



























































