असं झालं तर… चोरी झालेल्या डिव्हाइसमधून व्हॉट्सअ‍ॅप परत मिळवायचेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 तुमचा जुना फोन खराब झाला असेल किंवा हरवला असेल, तर तुम्ही बॅकअपचा वापर करून नवीन डिव्हाइसवर चॅट्स रिस्टोअर करू शकता.

2 तुमच्या खात्याचा बॅकअप आधीपासूनच आहे की नाही हे तपासण्यासाठी Google one हे अॅप स्टोरेज इतर (Storage > Other) वर टॅप करा.

3 तुमच्या खात्याचा बॅकअप असल्याची खात्री झाल्यावर, तुम्ही रिस्टोअर करणे सुरू करू शकता. तुमच्या खात्याच्या
बॅकअपमधून चॅट रिस्टोअर करता येते.

4 बॅकअपमधून चॅट रिस्टोर करण्यासाठी WhatsApp अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. सूचना मिळाल्यावर ‘पुनर्स्थापित करा’ (Restore) वर टॅप करा.

5 जर वेगळा बॅकअप घेतला गेला असेल, तर तुम्ही (Restore) करणे नाकारल्यानंतर तुम्हाला मिळालेले चॅट्स जुन्या बॅकअपच्या जागी ठेवले जातील