
‘मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही,’ हे वाक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किती वेळा उच्चारले असेल त्याला गणतीच नाही. देवाभाऊ, पुढच्या पिढीचे सोडा, पण दुष्काळ, कर्ज, महागाईशी संघर्ष करून थकलेल्या शेतकऱ्याच्या आताच्या पिढीला जीवन नकोसे झाले आहे. मराठवाड्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. आठ महिन्यात 653 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले असून त्यात सर्वाधिक 149 आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत.
छत्रपती संभाजीनगर – 138
जालना – 61
परभणी – 45
हिंगोली – 44
नांदेड – 82
बीड – 149
लातूर – 46
धाराशीव – 88
शेतकरी कर्जमाफीच्या नियम अटींचा ताण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली, परंतु त्याचा लाभ मिळण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डोक्याला नियम, अटींचाच ताण झाला. अतिवृष्टी, गारपिटीचे तीन तीन वर्षांची मदत अद्यापही मिळालेली नाही. ज्याच्याकडे अपेक्षेने बघायचे त्याच सरकारने पाठ फिरवल्याने शेतकरी मरणाच्या दारात जात आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात मराठवाड्यात 653 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.



























































