झहीर सीएसकेच्या प्रशिक्षकपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) आयपीएलच्या आगामी हंगामापासून हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. झहीर आता सीएसके संघाचे प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेईल.

झहीरची कारकीर्द शानदार राहिली आहे. झहीरने हिंदुस्थानसाठी 92 कसोटी सामन्यांमध्ये 311 विकेट्स आणि 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये 282 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर झहीरने 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 फलंदाजांना बाद केले होते. झहीरने आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले. झहीरने एपूण 100 सामने खेळून 102 विकेट्स घेतले. आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपदही भूषवले होते. झहीरने प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे. त्याने 2018 ते 2022 या काळात मुंबई इंडियन्सचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक म्हणून काम पाहिले, ज्या काळात संघाने सलग दोन आयपीएल विजेतेपद जिंकले. त्यानंतर झहीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शकही बनला होता.