घाटकोपरमध्ये गणेश मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रागाने बघितल्याचा गैरसमज करून मंडळाच्या कार्यकर्त्याला कानाखाली लगावल्याचा जाब विचारायला गेलेल्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाची छातीत चाकू खुपसून हत्या करण्यात आली. घाटकोपर पूर्वेकडील कामराजनगरात ही संतापजनक घटना घडली.

सेव्हन स्टार स्पोर्टस् क्लब या मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्मा याने रागाने बघितले असा समज करून रौनक सोनवणे याने विनयच्या कानाखाली लगावली. याचा जाब विचारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश देवेंद्र (35) रौनककडे गेले. तेव्हा पुन्हा शाब्दिक बाचाबाची होऊन रौनक तसेच आकाश सोनवणे, अश्विन उनवणे, श्रेयस शुक्ला, बबलू आणि स्टीफन  नाडर ऊर्फ अण्णा या सात जणांनी मिळून राजेशला बेदम मारहाण केली.