10 हजार रुपयांच्या पगारासाठी 24 कोटींचे कपडे जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
khoka-bhai-satish-bhosale-house-set-on-fire-by-unknown-persons-family-members-beaten-up

गुजरातच्या सुरतमध्ये संगिनी टेक्स्टाईल बाजारात 9 सप्टेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे 24 कोटी रुपयांचे कपडे जळाले होते. याप्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांनी या बाजारातील एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्या विनोद सावळे (33) याला अटक केली आहे. त्याने सांगितले की, दुकान मालकाने त्याचा 10 हजार रुपयांचा पगार थकित ठेवला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने बाजारात पेट्रोल ओतून आग लावली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर विनोदवर गुन्हा दाखल केला होता.