भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांची जेवणासाठी फ्री-स्टाईल, संघटनात्मक बैठकीनंतर दोन गट भिडले; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून भाजप कार्यकर्त्यांत प्रंचड वाद झाला. जिह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांच्य अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीनंतर दोन गट एकमेकांना भिडले. या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

भंडारा जिह्यातील मोहाडी येथे भाजपच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर जेवणासाठी मोठी गर्दी झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर अरेरावी आणि मारहाणीला सुरुवात झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.

एकमेकांच्या कॉलर पकडून धक्काबुक्की

बैठकीतील शेवटचे भाषण संपताच उपस्थित कार्यकर्ते भोजन व्यवस्थेकडे धावले. जेवण मिळवण्याच्या घाईगडबडीत आणि गर्दीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यातूनच काही कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.