
बनाकट कागदपत्रे आणि ऑडिट अहकाल तयार करून पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांनी तीन कंपन्यांसाठी शासनाचा कोटय़वधींचा कर बुडवला आहे. त्यांनी कंपन्यांचे तब्बल 4 हजार 427 कोटी 93 लाख रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर न जमा करता फसवणूक केली आहे. ही घटना 2022 ते सप्टेंबर 2026 कालावधीत कात्रज-कोंढवा रोडवरील शिवसमृद्धी आर्केड इमारतीतील कार्यालयात घडली आहे. तीन कंपन्यांना फायदा मिळकून देण्यासाठी आरोपींनी बनाकट 15 सीबी आणि 15 सीए फॉर्म तयार करुन पोर्टलवर अपलोड केले आहेत. त्यानुसार येकलेकाडी पोलिसांनी दोन सीएंकिरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एमएस ओडी अँड असोसिएट्स फर्मचे अंकुश कुमार सुरेशचंद बागरेचा (34) आणि मोहित शिककुमार तोडी (33) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक आयकर निदेशक तन्मयी सुहास देसाई (31) यांनी कोंढवा बुद्रूक येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4), 234, 229 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बागरेचा आणि तोडी हे चार्टर्ड अकाउंटंट असून, सन 2022 ते 2026 कालावधीत त्यांनी संगनमत केले. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या मात्र प्रत्यक्षात कर्मचारी नसलेल्या बोगस कंपन्यांच्या क्यकहारांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे तयार केली. त्यानंतर मागील चार वर्षांत आरोपींनी परदेशात पैसे पाठकण्यासाठी आकश्यक असलेली बनाकट फॉर्म 15सीबी प्रमाणपत्रे तयार केली. ही प्रमाणपत्रे आयकर किभागाकडे खरी असल्याचे भासकून सादर केली. तसेच फॉर्म 15 सीए प्रमाणपत्र तयार करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी ते तयार करून पोर्टलवर सादर केले. फसवणुकीच्या उद्देशाने आरोपींनी तीन कंपनींच्या फायद्यासाठी चार वर्षांत तब्बल 4,427 कोटी 92 लाख 44 हजार 408 रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर बुडवला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.



























































