
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आगामी कार्यकारी परिषद निवडणुकीत उभा राहणार आहे. योगेश्वरने मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर योगेश्वरने सांगितले की, मी कार्यकारी परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुका 5 डिसेंबर रोजी होणार आहेत. ‘देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयओएची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. निवडणुकीनंतर निवडलेला नवीन संघ हिंदुस्थानी खेळांना नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करेल. 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत आणि त्यानंतर हिंदुस्थानचे 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे स्वप्न आहे. तोपर्यंत आपण एक क्रीडा महासत्ता म्हणून उदयास आले पाहिजे. यामध्ये आयओएची महत्त्वाची भूमिका आहे, ही भूमिका योगेश्वरने यावेळी व्यक्त केली.



























































