
पारुल विद्यापीठात सुरू असलेल्या 45 व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत दणदणीत विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींनी तेलंगणाचा 25-15 असा एक डाव व 10 गुणांनी धुव्वा उडवला, तर मुलांनी तामीळनाडूला 33-25 असे 8 गुण व 1 मिनिट 40 सेपंद राखून नमवले. त्यामुळे महाराष्ट्र आता जेतेपदापासून केवळ दोन पावले दूर आहे.
मुलींच्या लढतीत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आक्रमण आणि संरक्षणात वर्चस्व गाजवले. धनश्री कांकने 4 मिनिटे 10 सेपंद संरक्षणासह 6 गुण मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला. वेदिका तामखडे, धनश्री तामखडे यांनी संरक्षणात भक्कम किल्ला लढवला.
मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने निर्णायक क्षणी आक्रमणाची धार वाढवत बाजी मारली. हृदया वसावेने 1 मिनिट 32 सेकंद संरक्षण आणि 8 गुण, तर पार्थ देवकातेने 1 मिनिट 18 सेपंद संरक्षण व 6 गुण मिळवत विजयाचा पाया रचला. गौरव कुडाळेने 2 मिनिटे संरक्षणासह 4 गुण, तबराज खानने 4 आणि सोत्या वळवीने 4 गुण मिळवत मोलाची साथ दिली.



























































