आरोग्य – अश्मरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. आशुतोष कुलकर्णी<<

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास लघवी, लाळ आणि पित्तातील क्षार घट्ट होऊन त्यांचे खडे बनत नाहीत. लघवी, मळ यांचे नैसर्गिक वेग कधीही अडवून ठेवू नयेत. स्राव साचून राहिल्यास खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते.

आजच्या काळात आहार-विहाराच्या अयोग्य सवयीमुळे मानवी शरीरात विविध अवयवांमध्ये खनिजे, क्षार किंवा इतर स्राव साचून कठीण खडे तयार होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. उदा- सर्वात जास्त आढळणारे मूत्रमार्ग, मूत्रपिंडात तयार होणारे किडनीतून मूत्राशयाकडे जाणाऱ्या नलिकेत अडकणारे, मूत्राशयात साचून तयार होणारे खडे दिसून येतात. तसेच पित्ताशयातील किंवा पित्ताशयातून आतडय़ाकडे पित्त नेणाऱ्या नलिकेत अडकलेले खडे. यामुळे कावीळ होऊ शकते.

लाळ ग्रंथीतील खडे हे तोंडात लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये कॅल्शियमचे क्षार साचून खडे तयार होतात.

याचे मुख्य लक्षण म्हणजे जेवताना किंवा आंबट पदार्थ पाहिल्यावर तोंडात लाळ सुटते, पण खडय़ामुळे लाळेचा मार्ग अडवला जातो. त्यामुळे गालाखाली किंवा जबडय़ाखाली अचानक सूज येते आणि वेदना होतात.

वीर्य ग्रंथीतील खडे हे पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढत्या वयानुसार किंवा संसर्गामुळे कॅल्शियम फॉस्फेटचे सूक्ष्म खडे तयार होतात.

पाश्मरी आयुर्वेदात सुश्रुत संहितेमध्ये याचे स्वतंत्र वर्णन आहे. वीर्यधारणा केल्याने (वेग अडवल्याने) किंवा स्राव साचून राहिल्याने पावाहिन्यांमध्ये किंवा पाशयात लहान खडे तयार होतात. यामुळे लघवीला व वीर्यस्खलनाला वेदना होतात.

आणखी काही प्रकार म्हणजे घशातील टॉन्सिल्सच्या खाचांमध्ये अन्नकण, मृत पेशी आणि बॅक्टेरिया साचून पांढरे-पिवळसर मऊ खडे.

स्वादुपिंडात तयार होणारे तसेच फुप्फुसाच्या श्वासनलिकेत जुन्या संसर्गामुळे पोटात किंवा आतडय़ात न पचणारे पदार्थ, केस किंवा खनिजे साचून आतडय़ात तयार होणारे खडे डोळ्यांतून अश्रू वाहून नेणाऱ्या नलिकेत क्षार व प्रथिने साचून तयार होणारे खडे. रक्तवाहिन्यांमध्ये, विशेषत ओटीपोटातील शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या कठीण होऊन कॅल्शियम साचल्याने बनणारे लहान खडे असे अनेक प्रकारचे अश्म शरीरात तयार होतात आणि त्रास देत असतात.

कधी कधी योग्य निदान न झाल्याने याचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून वेळीच तज्ञ डॉक्टरांकडून आणि आधुनिक परीक्षण तंत्राचा वापर करून निदान करणे गरजेचे आहे. भोंदू डॉक्टरांकडून उपचार करून वेळ दवडू नये.

ज्या अवयवात हा स्टोन झाला असेल त्यानुसार लक्षणे दिसून येतात. जसे की, मूत्राश्मरी झाल्यास मूत्रमार्ग दाह, वेदना, पोटात असह्य दुखणे. पित्ताश्मरी असल्यास पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे, बरगडय़ांच्या खाली उजव्या बाजूला किंवा पोटाच्या मध्यभागी (जठराजवळ) अचानक तीव्र वेदना होणे. विशेषत तेलकट किंवा जड जेवणानंतर हे दुखणे वाढते. पोटातील वेदना उजव्या खांद्याकडे किंवा पाठीच्या मधोमध जाणे. अपचन, गॅसेस होणे, पोट फुगणे, मळमळ आणि उलटय़ा होणे. जर खडा पित्तनलिकेत अडकला तर डोळे व त्वचा पिवळी पडणे, लघवी गडद पिवळी होणे आणि ताप येणे ही गंभीर लक्षणे दिसतात.

वीर्यपतनाच्या वेळी वेदना होणे किंवा वीर्यातून रक्त येणे असे लक्षण पाश्मरीमध्ये आढळते.

टॉन्सिल स्टोनमध्ये तोंडाला तीव्र दुर्गंधी येते, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटते, गिळताना त्रास होतो आणि टॉन्सिल्सवर पांढरे-पिवळसर ठिपके दिसतात.

हे होऊ नये म्हणून दिवसातून किमान 3 ते 3.5 लिटर पाणी प्यावे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास लघवी, लाळ आणि पित्तातील क्षार घट्ट होऊन त्यांचे खडे बनत नाहीत. लघवी, मळ यांचे नैसर्गिक वेग कधीही अडवून ठेवू नयेत. स्राव साचून राहिल्यास खडे तयार होण्याची प्रािढया वेगवान होते. मूत्रमार्ग (ळऊघ्), घसा (ऊदहेग्त्त्ग्tग्s), दात किंवा पोटाचे संसर्ग अंगावर न काढता त्वरित बरे करावेत. कारण संसर्गामुळे क्षार साचण्याचे प्रमाण वाढते.

मूत्रमार्गातील खडे होऊ नयेत म्हणून मीठ आणि अति प्रमाणात मांसाहार करत असाल तर कमी करावे.

पुढील लेखात अधिक माहिती घेऊ.

[email protected]