800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर

पुष्करच्या जत्रेत एका रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. साबरमती मुर्रा जातीचे ब्रीड असलेला हा रेडा तब्बल 800 किलो वजनाचा असून त्याच्या विक्रीसाठी मालकाने 35 लाख रुपयांची किंमत ठेवली आहे.

युवराज असे त्या रेड्याचे नाव असून त्याला पाहण्यासाठी जत्रेत लोकांची गर्दी होत आहे. मात्र या रेड्याला जवळून पाहण्यासाठी लोकांना एका भेटीचे जवळपास दहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

युवराजच्या मालकाने ANI ला दिलेल्या मुलाखतीनुसार, ”युवराजचा आहार पौष्टिक आहे. युवराज दररोज काजू, बदाम, तूप, ग्रॅनोला, मका, दूध, फळं, चणे असा पौष्टीक आहात घेतो. आता पर्यंत त्याने 30 ते 35 मुलांना जन्म दिलाय. गेल्या जत्रेत त्याच्यावर 25 लाखाची बोली लागली आहे. पण आमची मागणी 35 लाखाची आहे.