जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत नुकतेच पार पडले. या शिबिरात आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रभू श्रीराम वनवासात मांसाहार करत होते, असे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्याचे घाटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.