भायखळा पोलीस कोंबिंग ऑपरेशन करत असताना माझगावच्या बॅ. नाथ पै मार्गावर एक तरुण पोलिसांना संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पोलिसांना एक किलो वजनाचे अफिम ड्रग्ज सापडले. वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शामराव पाटील व पथक परिसरात कोंबिंग ऑपरेशन करत होते. त्यावेळी बॅ. नाथ पै मार्गावर एक तरुण संशयास्पद हालचाल करताना पोलिसांच्या नजरेस पडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सोनाराम बिश्नोई ऊर्फ सुनील असे त्याचे नाव असून त्याच्याकडे पोलिसांना चार लाख रुपये किंमतीचे एक किलो अफिम सापडले.


























































