बिहारमध्ये गुंडांची महिलेला मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये दिवसेंदिवस गुंडाराज वाढत चालला असून शनिवारी गुंडाच्या टोळक्याने एका महिलेला भर दिवसा मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्यात हे गुंड हवेत गोळीबार करतानाही दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून पोलीस त्या गुंडांचा शोध घेत आहेत.

पीडित महिला ही एका खासगी शाळेची मालकीन आहे. गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक गुंड तिच्याकडून खंडणी मागत होते. मात्र तिने खंडणी देण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली असे बिहारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.