India Pak War – राजस्थानच्या तीन शहरांना अलर्ट, लोकांनी घरीच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

हिंदुस्थान पाकिस्तानच्या तणावादरम्यान राजस्थानच्या तीन शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाडमेर, श्री गंगानगर आणि जोधपूर शहरातील नागरिकांनी तातडीने आपल्या घरी जावे असे निर्देश सरकारने दिले आहेत.

बाडमेरच्या जिल्ह्याधिकारी टिना डाबी म्हणाल्या की शहरातील सर्वा नागरिकांना घरी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण बाजार बंद राहिल आणि शहरातले सर्व कामकाज बंद राहिल असेही डाबी म्हणाल्या. पहाटे पाच वाजता राजस्थानच्या काही भागातं रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स रहिवाशी भागात घिरट्या घालत होते. पण हिंदुस्थानी सैन्याने हे ड्रोन हवेतच नष्ट कले. या भागात 12 तासांसाठी ब्लॅकआऊट करण्यात आला होता.

श्री गंगानगर भागात प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. जोधपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकांना तातडीने घरी जाण्याचे निर्देश दिले आहे. तसेच यावेळी संपूर्श शहर बंद राहील आणि लोकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे जैसलमेर भागात सुरक्षेच्या कारणास्तव बाजार बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.