
दहशतवादी हल्ल्यात घर पडल्यास सरकारकडून नवीन घर दिले जाते. ‘26/11’ मुंबई हल्ल्यात पीडित देविका रोटावटचे घर पडलेले नाही. हल्ल्यात ती जखमी झाली होती. तिला नुकसानभरपाई देण्यात आली आहे, असे बुधवारी मिंधे सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. तुमची भूमिका काहीही असली तरी रोटावलने नुकसानभरपाई म्हणून घर मिळावे यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर तरी किमान निर्णय घ्या, असे न्यायालयाने सुनावले. एका आठवडय़ात निर्णय घेऊन त्याची माहिती सादर करा, असे न्यायालयाने नमूद केले.
यासाठी किमान चार आठवडय़ांची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी केली. त्यास नकार देत न्यायालयाने ही सुनावणी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत तहकूब केली.





























































