
अमरावती पेट्रोलच्या टॅंकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नांदगाव पेठ रोडवर पेट्रोलच्या टॅंकरला आग लागली. खड्ड्यात टॅंकर पलटी झाल्याने ही आग लागल्याची समजते.
अमरावतीचे मोरशी येथून पेट्रोलचे तीन टॅंकर हे एकामागोमाग जात होते आणि रस्त्याच्या बाजूला पाईपलाईनचे आणि रस्त्याचे कामही सुरु होते. दरम्यान नियंत्रण न झाल्याने खड्ड्यात टॅंकर पलटी होऊन ही आग लागल्याची समजते. पाठिमागे दोन टॅंकर होते ते लगेच पाठिमागे झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

























































