आदित्य एल 1 सूर्याच्या मार्गात झाला बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रो सूर्य मिशनमध्ये आणखी एक पाऊल पुढे गेलं आहे. इस्रोने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. आदित्य एल 1 हे यान सुरक्षित असून ते सूर्याच्या जवळ पोहोचण्यासाठी मार्गस्थ झालं आहे. इस्रोने यानाचा मार्ग बदलल्याचं वृत्त काही काळापूर्वी प्रसारित झालं होतं. त्याविषयी इस्रोनेच माहिती दिली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅजिक्टरी करेक्शन मनूव्हर अर्थात टीसीएम 6 ऑक्टोबर रोजी 16 सेकंदांसाठी घेण्यात आलं होतं. त्यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्रान्स लँग्रेजियन पॉईंट 1 इंसर्जन मनूव्हरचा माग काढल्यानंतर याच्या दिशेत बदल करण्यासाठी ही योजना करण्यात आली होती.

30 सप्टेंबर रोजी आदित्यने पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रवेश केला. आता सध्या आदित्य हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या लँग्रेज पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गस्थ झालं आहे. मंगलयाननंतर प्रथमच एखादं यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवण्यात आलं आहे. आता आदित्य जसंजसं पुढे जात जाईल, तसं काही दिवसांत मॅग्नोमीटर पुन्हा सुरू करण्यात येईल.

आदित्य एल 1 ला 2 सप्टेंबर रोजी पीएसलव्ही एक्सएल या यानातून पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलं होतं. त्यावेळपासून इस्रोने अंतराळयानाच्या कक्षेला चार वेळा वाढवलं आहे. जसं हे यान गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर लँग्रेज पॉईंटपर्यंत प्रवास केल्यानंतर आता या यानाचा एक वेगळा टप्पा सुरू झाला आहे.