आदित्य श्रीवास्तव देशात तर राज्यात समीर खोडे पहिला; यूपीएससीत महाराष्ट्राचा दबदबा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अर्थात ‘युपीएससी’चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. अनिमेश प्रधान दुसरा तर डोनुरू अनन्या रेड्डीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. युपीएससी परिक्षेत महाराष्ट्रातील 87 हुन अधिक उमेदवारांनी यश मिळवत आपला दबदबा कायम ठेवला आहे. समीर प्रकाश खोडे याने 42 वा रँक महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. तसेच अनिकेत हिरडे (81), विनय पाटील (122), शुभम थिटे (359) यांनी यश मिळविले आहे.

2023 मध्ये झालेल्या युपीएससीच्या अंतिम परिक्षेत 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये खुल्या प्रवर्गाचे 347, आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील 116, ओबीसी प्रवर्गातील 303, अनुसूचित जाती प्रवर्गाचे 165 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाचे 86 उमदेवारांची निवड झाली. आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि गट ‘अ’ व गट ‘ब’मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती होणार आहे. ल्ज्sम्.gदन्.ग्ह या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. 2021 आणि 2022च्या युपीएससी निकालामध्ये टॉप तीनमध्ये मुली अव्वल होत्या. दोन वर्षांनंतर यंदा मुलांनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्रातील गुणवंत

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. या उमेदवार आणि त्यांचा रँक (पंसामध्ये) पुढीलप्रमाणे ः समीर खोडे (42) नेहा राजपूत (51) अनिकेत हिरडे (81) विनय पाटील (122) विवेक सोनवणे (126) तेजस सारडा (128) जान्हवी शेखर (145) आशिष पाटील (147) अर्चित डोंगरे (153) तन्मयी देसाई (190) ऋषिकेश ठाकरे (224) अभिषेक टाले (249) समर्थ शिंदे (255) मनीषा धारवे (257) शामल भगत (258) आशिष उन्हाळे (267) शारदा मद्येश्वर (285) निरंजन जाधवराव (287) समिक्षा म्हेत्रे (302) हर्षल घोगरे (308) वृषाली कांबळे (310) शुभम थिटे (359) अंकेत जाधव (395) शुभम बेहेरे (397) मंगेश खिलारी (414) मयूर गिरासे (422) अदिती चौगुले (433) अनिकेत कुलकर्णी (437) क्षितिज गुरभेले (441) अभिषेक डांगे (452) स्वाती राठोड (492) लोकेश पाटील (496) सागर भामरे (523) मानसी साकोरे (531) नेहा पाटील (533) युगल कापसे (535) हर्षल महाजन (539) अपूर्व बालपांडे (546) शुभम पवार (560) विक्रम जोशी (593) प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन इंगोले (610) राजश्री देशमुख (622) संस्कार गुप्ता (629) सुमित तावरे (655) सुरेश बोरकर (658) अभिषेक ओझर्डे (669) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685) अजय डोके(687) सूरज निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (761) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी महल्ले (794) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत भोजने (849) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (943) स्नेहल वाघमारे (945) शुभम डोंगरदिवे (963) गौरव टेंभुर्णीकर (966) मयांक खरे (968) शिवानी वासेकर (971) श्रावण देशमुख (976) श्रुती उत्तम श्रोते (981) सुशीलकुमार शिंदे (989) आदित्य बामणे (1015)

पोलिसाचा मुलगा ‘साहेब’ झाला

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस अंमलदार म्हणून काम करणाऱया भगवान थिटे यांनी आपल्याही मुलाने यूपीएससी परीक्षा द्याव़ी आयएएस/आयपीएस होऊन अधिकारी व्हावे, अशी अपेक्षा उराशी बाळगून मुलाला लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवले आणि मुलगा शुभम याने यूपीएससीमध्ये 359वा रॅंक मिळवत वडिलांचे स्वप्न साकार केले. केक कापून मुलगा साहेब झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू तरळले. इंजिनियरिंगनंतरही शुभमने यूपीएससीत यश संपादन केले, याचा मनस्वी आनंद होत आहे, असेही थिटे यांनी सांगितले.