गिरगावातील नूतनीकरण केलेल्या शिवसेना शाखा क्र. 218चे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगाव येथील शिवसेना शाखा क्र. 218चे नूतनीकरण करण्यात आले असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. शाखाप्रमुख बाळा अहिरेकर यांच्या प्रयत्नाने या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले.

शिवसेना शाखेच्या या भव्यदिव्य वास्तूचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले असले, येथे आमचे फोटो लावले असले तरी खरे मानकरी त्म्ही शिवसैनिक आहात, असे आदित्य ठाकरे यांनी बोलताना स्पष्ट केले.  यावेळी खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, राजकुमार बाफना, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, जयश्री बाळ्ळीकर, युवासेना सचिव दुर्गा शिंदे, धरम मिश्रा, उपविभागप्रमुख शिवाजी राहणे, गजानन भोसले, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, युवा सेनेचे हेमंत दुधवडकर, प्रथमेश सकपाळ, अल्केश मेस्त्र्ााr आदी उपस्थित होते.

अभिनव उपक्रम

विभाग क्रमांक 12 आणि शिवसेना शाखेच्या वतीने अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार नूतनीकरण केलेल्या या शाखेत सौरऊर्जा प्रणाली उभारली आहे. सौरऊर्जा प्रणाली उभारणारी ही मुंबईतील पहिली शिवसेना शाखा ठरली आहे. विभागातील गरजूंसाठी ई-रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. तसेच दक्षिण मुंबईमधील शाळांमध्ये अग्निसुरक्षा कवच उपक्रमांतर्गत शाळांमधील अग्निसुरक्षा तपासणी आणि प्रशिक्षण युवा व्हिजन संस्था व युवासेना विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ, रेड कॉर्पस अॅण्ड सेफ्टी लिमिटेडच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.