
पर्यावरण रक्षणासाठी आरेच्या जागेवरून मेट्रो कारशेड हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. ही कारशेड आता कांजुरमार्ग येथे होणार असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कांजुरमार्ग येथील या कारशेडच्या जागेची आज पाहणी केली. यावेळी एमएमआरसीएल तसेच एएमआरडीएच्या अधिकाऱयांनी मेट्रो 3 आणि मेट्रो 6च्या कारशेडचा नकाशाच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादर केला. कांजूरमार्ग येथील ही कारशेड दोन ते अडीच वर्षांत बांधून पूर्ण होणार आहे.
आरे येथे होणाऱया मेट्रो कारशेडला पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे यांनीही कडाडून विरोध करतानाच पर्यावरणवाद्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण होण्याआधीच ही कारशेड आरे येथून हटवून कांजुरमार्ग येथे हलविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर ‘आरे वाचले’ असे ट्विट करीत पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला होता. आज तातडीने त्यांनी मुंबई मेट्रो कॉर्पेरेशन तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या अधिकाऱयांसोबत या जागेची पाहणी केली.
मातीचे परीक्षण सुरू झाले
सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो 3 आणि मेट्रो 6ची कारशेड कांजुरमार्ग येथे उभारली जाणार आहे. यासाठी या जागेच्या मातीचे परीक्षणही सुरू झाले असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली. 7 ऑक्टोबरपासून मातीचे परीक्षण सुरू करण्यात आले असून या जमिनीत बेसॉल्ट खडक आढळल्याने कारशेड बांधण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. अधिकाऱयांनी मेट्रो ट्रेन पुठून येईल त्याचप्रमाणे कारशेड पुठे उभ्या करण्यात येतील याबाबतची सर्व माहिती आदित्य ठाकरे यांना दिली.



























































