रस्त्याच्या नव्या निविदेत 300 कोटींचा फरक का? आदित्य ठाकरे यांचा पालिका आयुक्तांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रस्त्याच्या कामात होत असलेल्या घोटाळ्यांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वारंवार आवाज उठवल्यानंतर आज अखेर मुंबई महापालिकेने दक्षिण मुंबईतील रस्ते कामासाठी आज नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे या आधी जाहीर करण्यात आलेल्या निविदेनुसार याच कामांसाठी 1670 कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता याच कामासाठी 300 कोटींनी कमी म्हणजेच 1362 कोटींची निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे हा 300 कोटींचा फरक नेमका कशामुळे आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासक इकबालसिंह चहल यांना विचारला आहे.

मुंबईतील रस्ते कामासाठी पालिकेने काढलेल्या सहा कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. यामध्ये मिंधे सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांना ही कामे देण्यासाठी वाढीव दराने निविदा काढणे, नियमबाह्यरीत्या वाढीव रक्कम देणे, असे आरोप आदित्य ठाकरे यांनी केले होती. यासाठी त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह यांना वारंवार पत्र देऊन पाठपुरावा केला. अखेर दक्षिण मुंबईतील रस्ते कामांसाठी नेमलेल्या आणि काम रखडवणाऱया मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या पंत्राटदाराचे पंत्राट रद्द करण्यात आले असून आज 1362.34 कोटींची नवी निविदा प्रसिद्ध केली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुरक्षा ठेव 1 टक्क्यावरून 10 टक्के करा

नव्या निविदेत कामाची पिंमत कमी कशी झाली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ही पिंमत आधी जास्त होती की आता कमी करण्यात आली?, आता रस्त्याची कामे कमी केली का? असे सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर पूर्वीच्या पंत्राटदाराचा मुजोरपणा आणि कामांची पद्धत पाहता पालिकेने पंत्राटदारांची सुरक्षा ठेवचे प्रमाण एक टक्क्यावरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कंत्राटदाराला 52 कोटींचा दंड

  • खड्डेमुक्त मुंबईसाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील 397 किमीच्या 910 रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सुमारे सहा हजार कोटींहून अधिक खर्चाच्या या कामांचे कार्यादेश जानेवारी 2023 मध्ये पालिकेने पाच कंत्राटदारांना दिले होते.
  • यामध्ये 910 कामांपैकी गेल्या 11 महिन्यांत 123 कामे सुरू झाली असून उर्वरित 787 कामाला सुरुवात झालेली नाही. त्यात शहरातील दक्षिण मुंबईतील काँक्रीटीकरणाची कामे सुरू झालेली नाहीत.
  • मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या पंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. नियोजित वेळेत काम सुरू करण्यात न आल्याने पालिकेने या पंत्राटदाराला 52 कोटींचा दंड ठोठावून त्याचे पंत्राट रद्द करण्यात आले आहे.