
CUET UG 2026 परीक्षेच्या वेळी झालेला तांत्रिक बिघाड, त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान तसेच NEET पेपर लिक प्रकरण या सर्व मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ होत आहे. या मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांना परीक्षाही निष्पक्षपणे घेता येत नाही; तरीही, आपण निवडणुका मात्र निष्पक्षपणे घेऊ शकतो, असा विश्वास जगाने ठेवावा अशी त्यांची अपेक्षा आहे! अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांना परीक्षाही निष्पक्षपणे घेता येत नाही; तरीही, आपण निवडणुका मात्र निष्पक्षपणे घेऊ शकतो, असा विश्वास जगाने ठेवावा अशी त्यांची अपेक्षा आहे! NEET आणि CBSE परीक्षांच्या निमित्ताने उघडकीस आलेला निविदांमधील घोटाळा, भ्रष्ट कारभार आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा (HRD) हेतुपुरस्सर निष्काळजीपणा—या गोष्टी केवळ विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आणत नाहीत, तर भारताच्या जागतिक प्रतिष्ठेलाही मोठा धक्का पोहोचवतात.
They can’t conduct an examination in a fair manner, they expect the world to believe that they can conduct elections in a fair manner!
The rigging of tenders, the corrupt practices, the purposeful incompetence of the HRD ministry exposed in the NEET and CBSE examinations not…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 31, 2026
भारताचे आणि या परीक्षांना बसलेल्या लक्षावधी विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याबद्दल मंत्री प्रधान यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केलेच पाहिजे. ज्या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा ठरवण्यात मग्न असायला हवे होते, त्याच काळात या किशोरवयीन विद्यार्थ्यांनी CBSE मधील घोटाळा शोधून काढला आणि तो जगासमोर उघड केला आहे! केंद्रीय राजवटीने भारताला नेमके कोणत्या अवस्थेत आणून ठेवले आहे? असा सवाल त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.
































































