चड्डी-बनियन गँगवर कारवाई करा! आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्यात सध्या चड्डी-बनियन गँगची मुजोरी सुरू आहे. पण युती धर्मामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही, असा टोला लगावताना या चड्डी-बनियन गँगवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

चड्डी-बनियन गँगच्या कोणत्याही गोष्टी सध्या मुख्यमंत्र्यांना सहन कराव्या लागत आहेत. ही गँग कुणालाही धक्का-बुक्का मारतात. काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या सहनशीलतेचे मी काैतुक करतो. ते कुणावरही कारवाई करीत नाहीत. मात्र सध्या मुंबई-महाराष्ट्रात जे सुरू आहे, त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी चड्डी-बनियन गँगवर कारवाई करावी आणि शासन काय असते हे दाखवून द्यावे असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले.