विधान परिषदेत पदवीधरांचा आवाज बुलंद करा – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पदवीधरांच्या अनेक समस्या असून पदवीधरांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना आणि युवासेना आंदोलन करत होती तेव्हा पदवीधरांचे आमदार कुठे होते, कुणाला माहीत होते पदवीधरांचे आमदार कोण आहेत… पदवीधरांच्या प्रश्नांवर युवासेना लढतेच आहे, पण पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधान परिषदेमध्ये पदवीधरांचा हक्काचा आमदार हवा म्हणून २५ जूनला कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करून पदवीधरांचा आवाज विधान परिषदेतही बुलंद करा असे आवाहन शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करताचा शिवसेना झिंदाबाद… युवासेना झिंदाबाद… येऊन येऊन येणार कोण शिवसेनेशिवाय आहेच कोण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकणात झंझावाती दौरा झाला. पदवीधर निवडणुकीचे वातावरण तापले असून मोठय़ा संख्येने पदवीधर शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत.