आग्र्यात प्रवाशांनी भरलेल्या बसचे गुंडाकडूंन अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील काही गुडांनी चक्क एका प्रवासी बसचे अपहरण करून प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. अद्याप या बसबाबत काहीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या बसमध्ये 34 प्रवासी असल्याचे समजते. चालक व वाहकाला त्या गुंडांनी दिल्ली कानपूर महामार्गावरील कुबेरपूर जवळ सोडले त्यानंतर त्या दोघांनी या प्रकाराबाबत पोलिसांना कळवले.

ही बस गुरुग्रामवरून मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्याच्या दिशेने निघाली होती. त्य़ावेळी आग्र्यातील मलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणी बायपास जवळ हा प्रकार घडला.रात्री साडे दहाच्या सुमारास कारमधून आलेल्या काही गुंडांनी बस थांबविली व बंदूकीचा धाक दाखवत बसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बसचालकाला व वाहकाला बंधक बनवून त्यांच्यातील एकाने बस चालवायला घेतली. त्यानंतर ते बस फतेहबादला घेऊन गेले. तिथून त्यांनी दिल्ली कानपूर महामार्गावर बस चालक व वाहकाला सो़डले. त्यानंतर ते बस घेऊन गेले. या प्रकरणी पोलिसांना चालक व वाहकाने कळविल्यानंतर बसचा शोध सुरू करण्यात आला आहे.