‘आरआरआर’मध्ये झळकणार आलिया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री आलिया भट्टने चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. आपल्या आगामी आरआरआर चित्रपटामधील लूक तिने शेअर केला आहे. बाहूबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या या चित्रपटात आलिया ‘सीता’ या भूमिकेत झळकणार असून फर्स्ट लूक तिने ट्विटरवरुन शेअर केला आहे. यात तिने हिरवी साडी, बिंदी, झुमके असे पारंपरिक दागिने घातले आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना भावला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. यात तिच्यासोबत राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार दिसणार आहेत.