
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगात सर्व सोईसुविधा मिळत असल्याचा दावा ईडीने यापपूर्वी कोर्टात केला होता. भाजपने आता त्यांना ‘मसाज’सेवा दिली जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. भाजपने व्हायरल केलेल्या व्हिडीओंमध्ये जैन यांची एक व्यक्ती पाठ आणि पाय चेपत असताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या कोठडीत काही मंडळी जैन यांच्याशी गप्पा मारत असून एक व्यक्ती त्यांच्या पायांना तेलाने मसाज करत असल्याचं दिसत आहे.
So instead of Sazaa – Satyendra Jain was getting full VVIP Mazaa ? Massage inside Tihar Jail? Hawalabaaz who hasn’t got bail for 5 months get head massage !Violation of rules in a jail run by AAP Govt
This is how official position abused for Vasooli & massage thanks to Kejriwal pic.twitter.com/4jEuZbxIZZ
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) November 19, 2022
The horrible conditions at Tihar Jail which is administered by @ArvindKejriwal Govt. This is Satyendra Jain, a Minister in Team Kejri, having a harrowing time in his Tihar Jail cell. #AAP ka ‘Delhi Model’ for doubters.pic.twitter.com/NnXT1LS3Fw
— Kanchan Gupta 🇮🇳 (@KanchanGupta) November 19, 2022
आम आदमी पक्षाने या व्हिडीओंबाबत दिलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की सत्येंद्र जैन यांच्यावर अॅक्युप्रेशन पद्धतीने उपचार सुरू असून त्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी घेतली आहे. सत्येंद्र जैन हे दिल्लीचे आरोग्यमंत्री असून त्यांच्यावर कोलकात्यातील एका कंपनीसोबत हवालाद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती ज्यामध्ये त्यांना 2 कोटींपेक्षा अधिकची रक्कम आणि 1.8 किलो सोनं मिळालं होतं. ही छापेमारी करण्यापूर्वी ईडीने जैन यांच्या 4.81 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.
जैन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी दिल्लीमध्ये बोगस कंपन्या बनवल्या आणि त्या आधारे जवळपास 16.91 कोटींचा काळा पैसा सफेद केला होता. सत्येंद्र जैन याच्यावर तिहार तुरुंगात घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यानेही आरोप केले होते. तुरुंगात चांगल्या सोईसुविधांसाठी मी सत्येंद्र जैन यांना महिन्याला 2 कोटी रुपये देत होतो असं सुकेश याने नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
























































