बॉलिवूड अभिनेता ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. यावेळी तिने नक्की कारण सांगितले नव्हते. मात्र नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने ‘माझे लैंगिक शोषण झाले होते’, असा गौप्यस्फोट केला आहे.
नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इरा हिने मला कधी समजलेच नाही की मी का डिप्रेशनमध्ये आहे. गेल्या काही वर्षात हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला, मात्र अयशस्वी राहिले. तसेच वडिलांच्या घटस्फोटामुळे देखील मी डिप्रेशनमध्ये गेले नव्हते, असेही ती सांगते.
तसेच आपल्याला पैशांची चिंता कधी भासली नाही, असेही ती सांगते. माझे आई-वडील, मित्र यांनी कधीही कोणत्या गोष्टींसाठी माझ्यावर दबाव टाकला नाही. आई-वडिलांचा घटस्फोट झाला, 6 वर्षाची असताना टीबी झाला तेव्हाही मला एवढे दुःख जाणवत नव्हत, असेही इरा म्हणते.
मी 14 वर्षांची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते. तेव्हा मला काय होतंय याचा पत्ता नव्हता, मात्र मी हे माझ्यासोबत होऊ कसे दिले याचा विचार करून मला वाईट वाटत होते. परंतु तो देखील एवढा मोठा धक्का नव्हता, ज्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जाईल.
मी माझ्या आई-वडिलांशी, मित्रांशी प्रत्येक गोष्ट शेअर करते. पण आता काय सांगू? ते मला विचारतील का? तर मी काय सांगणार. माझ्यासोबत काही वाईट झाले नाही असाच विचात मी करत असते, असेही ती म्हणते.