आमीर खान आणि करीना कपूर अभिनित ‘लाल सिंह चड्ढा’चे चित्रीकरण पूर्ण!

सध्या कोरोनामुळे चित्रपटसृष्टी थंडावली आहे. अनेक निर्माते दिग्दर्शकांना दिवाळी-नाताळचे वेध लागले आहेत. त्यामुळे चित्रीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या यादीत लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

अकॅडमी पुरस्कार विजेता ‘फॉरेस्ट गंप’चे अधिकृत हिंदी रिमेक असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ या वर्षी नाताळात प्रदर्शित होत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा कॉमेडी-ड्रामा आपल्या घोषणेपासूनच अनेक योग्य कारणाने चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट सहा अकॅडमी पुरस्कार विजेता राहिलेला ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे.

करीना कपूर खान अभिनित, ‘लाल सिंह चड्ढा’चे चित्रिकरण मागील वर्षी सुरू करण्यात आले होते आणि त्याला देशभरातील विविध 100 स्थानांवर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईमध्ये पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने संपूर्ण कास्ट आणि क्रूने सेटवर एकत्र येऊन ‘आतापर्यंतच्या सर्वात लक्षवेधी चित्रपटाचे पूर्ण होणे’ साजरे केले.

आमीर खान प्रोडक्शन्स, वायकॉम 18 स्टुडिओ आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून अद्वैत चंदन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ येत्या नाताळात प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या