ज्यांना चित्रपट बघायचा नसेल त्यांच्या… आमीर खान स्पष्ट बोलला

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. एकीकडे आमीर प्रमोशन करत असताना दुसरीकडे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सुपरट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे आमीर खानची चिंता वाढली आहे. आपला चित्रपट चालावा म्हणून आमीर खान चाहत्यांना वेगवेगळ्या प्रकारे संदेश देत आहे. मात्र त्या सोबतच त्याने ज्यांना हा चित्रपट बघायचा नाही त्यांना देखील एक संदेश दिला आहे.

”मी सध्या चित्रपटासाठी देवाकडे प्रार्थना करतो. माझा माझ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे. जर मी काही बोलून कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याचं मला दु:ख आहे. मला कुणालाही दुखवायचे नाही. ज्यांना हा चित्रपट पाहायचा नाही. मी त्यांच्या या गोष्टीचाही आदर ठेवतो. अजून काय बोलू शकतो मी यावर’, असे आमीरने दिल्लीतील एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सांगितले.

”पण माझी इच्छा आहे की हा चित्रपट जास्तित जास्त लोकांनी पाहावा. आम्ही खूप मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. मी एकटा या चित्रपटात काम करत नाहीए. एक चित्रपट बनतो त्यासाठी शेकडो लोकं मेहनत करत असतात. मला खात्री आहे लोकांना हा चित्रपट आवडेल’, असा विश्वास आमीर खानने यावेळी व्यक्त केला आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.