बलात्काऱ्यांच्या फाशीचे लाईव्ह टेलिकास्ट झाले पाहिजे, अभिनेत्रीची मागणी

1118

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. यावरून एका अभिनेत्रीने बलात्काऱ्याच्या फाशीचे लाईव्ह टेलिकास्ट झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. अभिनेत्री आम्रपाली दुबे हिने ही मागणी केली आहे.

aamrapali-dube-2

आम्रपाली दुबे हिने एका कार्यक्रमात बोलताना बलात्काऱ्यांबाबत विचारले असता हे वक्तव्य केलं आहे. ‘माझं मत आहे की बलात्काराएवढा मोठा अपराध नाही. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे. तसेच त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट झालं पाहिजे जेणेकरून असा अपऱाध करणाऱ्यांचा थरकाप उडाला पाहिजे. त्यामुळे बलात्काऱ्यांना सर्वांदेखत फाशी दिली पाहिजे’, असे आम्रपाली दुबे हिने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या