वाचकांना मूळ पुस्तकांकडे नेणारे मौलिक ईबुक! डॉ. अनंत देशमुख यांनी केले ‘आणि ग्रंथोपजिवीये’ चे कौतुक

कवी, चित्रकार श्री रामदास खरे यांच्या ‘आणि ग्रंथोपजीविये- भाग-2 ‘ या ईबुकचे प्रकाशन ज्येष्ठ संशोधक, समीक्षक, संपादक डॉ अनंत देशमुख यांचे हस्ते झाले. ‘आणि ग्रंथोपजीविये’ हे या पुस्तकाचं शीर्षक संतपरंपरेचं नातं सांगणारं आणि साहित्याविषयीची आत्मीयता दर्शवणारं आहे,  खरे यांचे अशा प्रकारचे लेखन हे पुढील काळातील लेखक, वाचकांना वस्तुपाठ ठरेल अशा प्रकारचे आहे अशा शब्दात देशमुख यांनी या पुस्तकाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला ई साहित्य प्रतिष्ठानचे श्री सुनील सावंत हे देखील आवर्जून उपस्थित होते. ” या ईबुक माध्यमातून वाचकांची संख्या वाढवणे हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे असं सावंत यांनी म्हटलं. ‘आणि ग्रंथोपजिवीये’ मध्ये लेखक रामदास खरे यांनी परिक्षणांचे एकत्रिकरण केले असून ते 4 भागांत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे. या कार्यक्रमाचे निवेदन कवयित्री, अनुवादक सुजाता राऊत यांनी केले होते. लेखिका अस्मिता प्रदीप येंडे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

आपली प्रतिक्रिया द्या