
आसाम सरकारने आता लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसण्याचे ठरवले आहे. 2021 सालापासून दोनहून अधिक अपत्ये असणाऱया आसामी नागरिकांना आता सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय सोमवारी आसामच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.
आसामच्या मंत्रिमंडळाने नुकतेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात कुटुंबनियोजनाबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णयही मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल मंत्रिमंडळाने घेतला.आसाम सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये आपले लोकसंख्या नियंत्रण आणि महिला सबलीकरणाचे धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार यापुढे आता दोनहून अधिक अपत्ये असणाऱया आसामी नागरिकांना सरकारी नोकरी दिली जाणार नाही. सध्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱयांनीही फॅमिली प्लॅनिंगचे नियम पाळावेत अशा सूचना आसाम सरकारने दिल्या आहेत.



























































