अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण – मॉरीसच्या बॉडीगार्डचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळय़ा झाडणाऱया मॉरीस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. मॉरीसला पिस्तूल देण्यासाठी मिश्राने पैसे घेतले होते का? ते पिस्तूल इतर गुह्यात वापरले होते का, याचा तपास बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्याची गंभीर दखल घेत न्यायाधीश राजेश सासणे यांनी मिश्राचा अर्ज धुडकावला.

मॉरीसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या ज्या पिस्तुलातून गोळय़ा झाडून केली, ते पिस्तूल मिश्राचे होते. त्यामुळे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिश्राला अटक केली. त्याने अॅड. शंभू झा यांच्यामार्फत जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या अर्जाला सरकारी वकील इकबाल सोनकर यांनी विरोध केला. हत्येच्या कटातील मिश्राच्या सहभागाचा तपास सुरू असल्याचा युक्तिवाद अॅड. सोनकर यांनी केला आणि जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.