पाचशे रुपयांची लाच स्वीकारणारा तलाठी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

वारसाहक्काने फेरफारला नोंद करून सातबारा देण्यासाठी पाचशे रुपयाची लाच स्वीकारल्यानंतर चाकूर तालुक्यातील तलाठी साजा गांजुर येथील तलाठी ओम प्रकाश भीमराव क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

तक्रारदारास वारसाहक्काने फेरफार नोंद करून सातबारा देण्याच्या कामासाठी चाकूर तालुक्यातील मौजे गांजुर तलाठी सज्जाचे तलाठी ओम प्रकाश भीमराव क्षिरसागर (वय 55) यांनी एक हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. पाचशे रुपयात तडजोड झाल्यानंतर लाचेची पाचशे रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी हा सापळा आयोजित केला होता. यासाठी पोलीस कर्मचारी संजय पस्तापुरे, व्यंकट पडिले, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, नानासाहेब भोंग, शैलेश टुडे, विष्णू गुंडरे, सचिन धारेकर, दत्ता विभुते, प्रदीप स्वामी, शिवकांत शेळके यांनी परिश्रम घेतले. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.