अंबाजीनजीकच्या घाटात बस उलटून 20 ठार, 30 जखमी; बसमधून क्रेनने मृतदेह काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र अंबाजीनजीकच्या मिशुलिया घाटात सोमवारी सायंकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वळणावर उलटून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बसमधील 20 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाला असून उलटलेल्या बसमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. या अपघाताची भीषणता पाहता त्यातील बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

अंबाजी दुर्घटनेचे वृत्त हृदय हेलावून सोडणारे आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातातील जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना दिली.