गुजरातमधील अपघातात निर्मळ पिंप्रीतील चौघांचा मृत्यू

1649

कोल्हार खुर्द व निर्मळ निर्मळ पिंप्री येथील चार युवकांचा गुजरात येथे देवदर्शनाहून परतताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. प्रवीण सारंगधर शिरसाठ (वय 45, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) नंदकिशोर संपत निर्मळ (वय 28), गोरख एकनाथ घोरपडे ( दोघे रा. निर्मळ पिंपरी, ता. राहाता) आणि किशोर राजाराम कोल्हे (वय 42, रा. वैजापूर, ता. नांदगांव) अशी मृतांची नावे आहेत.

कोल्हार खुर्द येथून प्रवीण शिरसाठ निर्मळ पिंप्री येथील तीन मित्रांसोबत गुजरात येथे कुबेराच्या दर्शनास गेले होते. देवदर्शन आटोपून परतत असताना गुजरातजवळ राजपीपाला घाटात मध्यरात्री त्यांच्या कारने ट्रकला जोराची धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या