
पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा-पूर्णा मार्गावरील कात्नेश्वर जवळ वऱ्हाड घेऊन जात असलेल्या इनोव्हा कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. सोमवार, 8 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये गौर येथील किशन विठ्ठलराव पारवे ( वय 70) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले.
सेलू येथून लग्न समारंभ उरकून गौर येथील हे वऱ्हाड परत येत होते. इनोव्हा या दोन्ही वाहनांमध्ये जोराची धडक झाली. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात चालक कालीदास केशव पारवे ( वय 23)गंभीर जखमी झाले आहेत. कारमध्ये एकूण 7 जण होते. यामध्ये कोंडीराम विठ्ठल पारवे (67), सुरेश धोंडीराम पारवे (38), धोंडीराम नानाराव पारवे (55), वैजनाथ रामराव पारवे (45), प्रभाकर नारायण पारवे (40) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






























































