
दिंडोशी सत्र न्यायालयातून आरोपीने पळ काढल्याची घटना घडली. इब्राहिम साजिद मुजावर असे त्याचे नाव आहे. पळून गेल्यानंतर रात्री त्याने आर्थररोड तुरुंगातून आत्मसमर्पण केले. कायदेशीर रखवालीतून पळ काढल्याप्रकरणी त्याच्या विरोधात कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तक्रारदार हे सशस्त्र पोलीस विभागात काम करतात. शुक्रवारी त्यांना आर्थर रोड तुरुंगातून आरोपीना दिंडोशी कोर्टात न्यायची जबाबदारी दिली होती. दुपारी त्याने इब्राहिमचा ताबा घेतला. त्याला न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयात सुनावणी संपल्यानंतर त्याला सरकारी वाहनाजवळ आणण्यात आले. तिथे तो दोन महिलांशी बोलून वाहनजवळ जात होता. तेव्हा त्याने तक्रारदार याच्या हाताला धक्का मारून पळ काढला. शोधमोहीम सुरू असतानाच तो आर्थररोड तुरुंगात आला. त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.



























































