
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कोठडीमधून सप्टेंबर महिन्यात पळून गेलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मध्ये पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 379/2022 कलम 307, 323, 506, 143, 147, 148, 1490 भादवी. 135 मपोका, प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी लखन ईश्वर कसबे राहणार करडखेड तालुका उदगीर याला अटक करण्यात आली होती.
तो अटकेमध्ये असताना उदगीर ग्रामीण पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून दिनांक 02/09/2022 रोजी पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. परंतु तो सापडत नव्हता. दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सदरचे पथक लातूर येथील गरुड चौक परिसरात कसबे यास ताब्यात घेण्यात आले. लखन ईश्वर कसबे यास पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलिस अंमलदार बालाजी जाधव, खुरर्म काजी, सचिन मुंडे, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर यांनी केली आहे.


























































