समुपदेशन झाले! सोलापुरात आता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिवहन आयुक्तालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता वाढीक दंडानुसार कारवाई होणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर आता बेशिस्तांवर कडक कारवाई केली जाणार आहे. विनालायसन्स वाहन चालविणाऱ्याला तब्बल पाच हजारांचा, तर हेल्मेट नसल्यास पाचशे रुपयांचा दंड आणि त्या दुचाकीस्वाराचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. दंडाची रक्कम रोखीने किंवा ऑनलाइन पद्धतीने जागेवरच भरावी लागणार आहे.

महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्याही भरमसाठ झाली आहे. मात्र, बेशिस्त वाहतूक विशेषतः रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी झालेले नाहीत. रस्ते अपघात व मृत्यूमध्ये सोलापूर शहर ग्रामीणचा राज्यातील टॉप टेन शहर-जिल्ह्यांत समावेश आहे. ही ओळख पुसण्यासाठी आता शहर पोलीस आयुक्तालयाने बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने 28 मुद्दय़ांवर कारवाई केली जाईल. त्यामध्ये वाहनपरवाना, विमा नाही, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तथा माल वाहतूक, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, मोबाईल टॉकिंग, ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह, शिकाऊ चालकासोबत प्रशिक्षक नाही, सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबकणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, नोंदणी होण्यापूर्वीच वाहनाचा वापर करणे, सिग्नल नियम मोडणे, मोठय़ा आवाजाचे हॉर्न, विना गणकेश वाहन चालविणे, वन-वेतून गाडी नेणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन लावणे, बेकायदेशीर नंबर प्लेट, विना सीट बेल्ट चारचाकी चालविणे, वाहनात मोठय़ा आवाजात गाणी, संगीत लावणे अशा मुद्दय़ांचा समावेश आहे.

3 जानेवारीपासून बेशिस्त वाहनचालकांकिरुद्ध थेट दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना आता जागेवरच दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांची गाडी जप्त केली जाणार असून, दंड भरल्यावरच ती सोडली जाणार आहे. रस्ते अपघातांची संख्या नियंत्रणात आणून अपघाती मृत्यू कमी करण्याच्या हेतूने बेशिस्तांकर कडक कारवाई केली जाणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर वाढीक दंडानुसार कारवाई होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले.