निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारल्यास कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याभरात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिल्यास लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये थेट गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी हे आदेश दिले आहेत.

यावेळी बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक 2019 साठी गठीत करण्यात आलेल्या आचारसंहिता अंमलबजावणी समिती, कायदा व सुव्यवस्था समिती, मनुष्यबळ व्यवस्थापक समिती, मतपत्रिका छपाई व टपाल मतपत्रिका व्यवस्थापन समिती, प्रशिक्षण व्यवस्थापन समिती, EVM-VVPAT व्यवस्थापन समिती, सपंर्क समिती व दळवळण आराखडा समिती आदी समितींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.