अमिताभ बच्चन करणार ‘नागीण’ आजाराविषयी जनजागृती

नागीण हा आजार 50 वर्षांहून अधिक वयाच्या प्रौढांना होतो. बिग बी अमिताभ बच्चन एका अभियानपटातून (फिल्म) नागीण आजाराच्या धोक्यावर आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा, यावर प्रकाश टाकणार आहेत. ‘लसीकरणाच्या माध्यमातून प्रौढांना या वेदनेपासून दूर ठेवणे शक्य आहे,’ असा महत्त्वाचा संदेश ही फिल्म देते.

या फिल्मसाठी जीएसकेने अमिताभ बच्चन यांना करारबद्ध केले आहे. जीएसकेच्या वैद्यकीय संचालक डॉ. रश्मी हेगडे म्हणाल्या, ‘‘अमिताभ बच्चन हे पूर्वीपासूनच अनेक आजार व लसीकरण जागरूकता अभियानांचा चेहरा आहेत. आज देशातील वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. त्यांना नागीणसारख्या आजाराबाबत जागरूक करण्याची गरज आहे. या फिल्ममुळे स्वतःचे किंवा स्वतःच्या जवळच्या लोकांचे या आजारापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळेल.’’ फिल्मची संकल्पना लोवे लिंटास यांची आहे.