बंदा…एकदम खणखणीत, वाढदिवशी मनोज वाजपेयीची चाहत्यांना भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेता मनोज वाजपेयी यांनी रविवारी आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मनोजने चाहत्यांना खास भेट दिली आहे. मनोजने त्याच्या आगामी ‘बंदा’ या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टरमध्ये मनोजचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

‘बंदा’ या चित्रपटात मनोज वाजपेयी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.  पोस्टर शेअर करत मनोजने लिहिलंय, ‘न्यायाचा विचार केला तर बंदा पुरेसा आहे. सत्य घटनांनी प्रेरित असलेल्या गोष्टीचे साक्षीदार व्हा.’ ‘बंदा’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोजच्या याआधी दोन कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. ‘साइलेंस, पॅन यू हियर इट?’ आणि ‘डायल 100’ अशी त्यांची नावे आहेत.

 मनोजचा ‘गुलमोहर’ चित्रपट अलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर , आता प्रेक्षकांना मनोजच्या सुपरडुपर हिट  ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागले  आहेत.