एम.एस. धोनीची ‘अथर्व: द ओरिजिन’ ग्राफीक कांदबरी प्रकाशित; रजनीकांत यांच्याकडून पहिली कॉपी लॉन्च

टिम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेद्रसिंह धोनीची नवीन जमान्यातील ग्राफीक कांदबरी ‘अथर्व: द ओरिजिन’ याचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. रजनीकांत यांनी या कांदबरीची पहिली कॉपी लॉन्च केली आहे. या ग्राफीक कांदबरीत धोनी एक वेगळ्याच रुपात सर्वांसमोर येत आहे. ही ग्राफीक कांदबरी विरजू स्टूडियोजने मिडास डील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने तयार केली आहे.

या कांदबरीतील धोनीच्या लूकने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यातील धोनीच्या आगळ्यावेगळ्या लूकचे कौतुक होत आहे. कांदबरीच्या मुख्पृष्ठावर धोनी सोनेरी कवच परिधान केलेल्या वेषात असून त्याचे लांब केस सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत. याआधी समोर आलेल्या त्याच्या लूकपेक्षा आता दिसणारा हा लूक खूप वेगळा आहे.

‘अथर्व: द ओरिजिन’ हे एक अभियान आहे. त्यात माझा सहभाग असल्याचा मला अभिमान आहे, असे धोनीने सांगितले. प्रतिभासंपन्न व्यक्तींनी एकत्र येत नव्या जमान्यातील ग्राफीक कांदबरी ही चांगली योजना असल्याचे तो म्हणाला. सुपरस्टार रजनीकांत यांनी या कामाची प्रशंसा केली आहे, तसेच त्यांनी या कांदबरीची पहिली कॉपी लॉन्च केल्याचा आनंद झाल्याचेही त्याने सांगितले.

धोनीची ही ग्राफीक कांदबरी लेखक रमेश थमिलमनी यांनी लिहिली आहे. ही एक विज्ञानविषयक कांदबरी आहे. या कांदबरीत एक पौराणिक विज्ञान कथा आहे. त्यात एका रहस्यमय अघोरी पात्राच्या जीवनप्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्राफीक कांदबरीचा हा अभिनव प्रयोग आहे. सध्या धोनी आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी सीएसके संघाचे नेतृत्व करण्यासाठी कसून सराव करत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने चार आय़पीएल चषक जिंकले आहेत.