‘खट्टा मीठा’, ’बातों बातों मे’ फेम ज्येष्ठ अभिनेते रणजित चौधरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘खट्टा मीठा’, ‘बातों बातों मे’ आणि ‘खुबसुरत’ अशा अनेक चित्रपटात आपल्या छोटयाशा पण दमदार भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक रणजित चौधरी यांचे बुधवारी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. येथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रणजित यांची बहीण पदमसी यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे रणजित यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

रणजीत चौधरी हे लोकप्रिय अभिनेत्री पर्ल पदमसी यांचे सुपुत्र. बॉलिवूडबरोबरच रणजीत यांनी हॉलिवूडमध्ये देखील आपले नशिब आजमावले होते. अभिनेता रणजित चौधरी यांनी ’खट्टा मीठा’ सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात त्यांनी अभिनेता अशोक कुमार यांच्यासोबत क्रीन शेअर केली होती. या सिनेमांतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तसेच ’बातों बातों मे’ आणि ’खुबसुरत’ सिनेमातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. सुमारे 40 सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणा-या रणजित यांना लोक विशेषतः ‘मिसीसिपी मसाला’ आणि ‘कामसूत्र’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. रणजीत यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केली आहे.